जुगार अड्ड्यावर छापा; साहित्यासह रोकड जप्त

0

पहूर – पहूर जवळील हिवरखेडा रोडलगत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पहूर पोलिसांनी बुधवारी रात्री छापा मारल्याची घटना घडली असून नऊ जुगार्यांविरूद्ध कार्यवाही करून अटक करण्यात आली आहे. तर पाच हजार पन्नास रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिवरखेडा रोडलगत शेतात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, साहाय्यक फौजदार अनिल अहिरे, शशिकांत पाटील, अनिल देवरे, नवल हटकर, किरण शिंपी यांनी बुधवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास छापा टाकला आहे. यादरम्यान जुगार खेळताना केतन प्रकाश जाधव, सागर रामराव पाटील, देवेंद्र सुभाष भोई, ज्ञानेश्वर चौधरी, विनोद चौधरी, अरीफ तडवी, महेश महालपूरे, अमोल पाटील, सतीश ढरे यांना ताब्यात घेऊन पो.काँ साहेबराव देशमुख यांच्या फिर्यादिवरून गुन्हा दाखल केला असून वरील सर्वांना अटक करून सुटका करण्यात आली आहे.