जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा

0

चाळीसगाव। शहरातील बस स्टँड समोर सार्वजनिक जागी जुगार अड्यावर चाळीसगाव शहर पोलीसांनी शनिवारी 26 रोजी दुपारी 2 वाजता छापा मारुन जुगार खेळणार्‍या 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

बस स्टँड समोरील यश कोल्ड्रिंक शेजारी सार्वजनिक ठिकाणी मांग पत्ता नावाचा जुगार चालु असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, हवालदार बापुराव भोसले, प्रकाश महाजन, पोलीस नाईक योगेश मांडोळे, पो कॉ संदीप भोई, नितीन पाटील, गोपाल भोई, प्रशांत पाटील यांनी छापा मारुन मांग पत्ता नावाचा जुगार खेळविताना व खेळतांना नितीन शिवाजी कुमावत, सागर भगवान चौधरी, गौतम रामदास खैरनार, मच्छिंद्र प्रकाश मोरे, विशाल सुकलाल सूर्यवंशी, दिनेश राजाराम पाटील, सुरेश महादु खंडागळे व द्न्यानेश्वर नथु पवार सर्व रा चाळीसगाव यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कडुन 5 हजार 260 रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. सर्व आरोपींना ताब्यात घेवुन त्यांची सुटका करण्यात आली. त्यांच्याव मुंबई जुगार अ‍ॅक्ट 12 (अ)प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.