जुगार खेळणार्‍या 11 जणांना अटक

0

धुळे। शहरातील मनमाडजीन परिसरात नाल्याकिनारी झन्ना-मन्ना जुगार खेळणार्‍या 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एलसीबीने ही कारवाई केली असून जुगारांकडून 5 हजार 680 रुपये जप्त केले आहे. या सर्वांविरुद्ध आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला. मनमाडजीन परिसरातील सोनदेवबाबा नगरात नाल्याकिनारी एका बंद घराच्या आडोशाला जुगार खेळला जात असल्याची खबर मिळाल्याने एलसीबी पथकाने काल सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी छापा टाकला. यावेळी सतीष सावाराम गोरे, रमाकांत भिमराव भडागे, विशाल सुभाष पवार, विनोद तुकाराम भडागे, दीपक लक्ष्मण बोरसे, अरुण नामदेव आवटे, दीपक रघुनाथ मिस्तरी, भरत दंगल पाटील, विशाल लक्ष्मण शिंदे, जय देविदास चौधरी, संजय भिकाजी मराठे हे झन्ना-मन्ना जुगार खेळतांना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळील 5 हजार 680 रुपये जप्त केले आहेत. शिवाय एलसीबीचे पो.कॉ.मनोज बागुल यांनी आझादनगर पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.