जुना वाद उफाळताच एका गटातून महिलांना जाळण्याचा प्रयत्न : अमळनेर तालुक्यातील घटना

Amalner Taluka Shaken : Attempt to burn two women over old Dispute ; One is in serious condition! अमळनेर : अमळनेर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली असून जुना वाद उफाळून आल्यानंतर एका गटातील नऊ आरोपींनी दोन महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला तर तिघांना जबर मारहाण केली. या घटनेत एकाची प्रकृती गंभीर झाली आहे. या प्रकरणी 9 जणांविरुद्ध विनयभंगसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून संशयीतांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

आधी केला महिलेचा विनयभंग
शनिवार, 3 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या वहिनी या सकाळी गावातील सार्वजनिक हाळवर धुणे धुण्यासाठी गेले होते. धुणे धुऊन परत येत असतांना सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास गावातील गावदरवाज्या जवळ आमच्या विरुध्द केलेल्या केसेस मागे घ्या, नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असे बोलुन विनोद सुकदेव पवार याने बळाचा वापर करुन पीडीतेचा हात पकडला आणि शरद उखा पवार याने अश्लिल कृत्य केले. यानंतर पिडीत महिलेने तिथून कसे-बसे घर गाठले.

महिलांच्या अंगावर ओतले पेट्रोल
फिर्यादीच्या घरासमोर संशयीत विनोद सुकदेव पवार, नितीन उखा पवार, रुपाबाई उखा पवार, शरद उखा पवार, उखा बुधा पवार, विमलबाई उखा पवार, रतीलाल रामलाल पाटील, हर्षल रतीलाल पाटील, प्रमोद रतीलाल पाटील यांनी हातात लाकडी दांडा तसेच एक प्लॅस्टीक बॉटल पेट्रोलने भरलेली लोखंडी रॉड, काठ्या घेवून फिर्यादीच्या परीवारातील आई, वहिनी, यांच्या अंगावर शरद पवार याने त्याच्या हातातील भरलेली प्लॅस्टीकची बाटलीमधील पेट्रोल त्यांच्या अंगावर टाकले व विनोद सुकदेव पवार याने त्याच्या हातातील काडी पेटीने जाळून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. इतर लोकांनाही धक्काबुक्की व चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. या भांडणात फिर्यादीचा भाऊ संदीप पाटील हा गंभीर जखमी झाला तर सतीश पाटील यांनादेखील मार लागल्याने वरील दोघांना अमळनेर येथील डॉ. अनिल शिंदे, यांचे नर्मदा फॉऊंडेशन, अमळनेर उपचारासाठी दाखल करण्यात आले . संदीप पाटील हा अद्याप पावेतो आय.सी.यु. मध्ये अ‍ॅडमीट असुन शुध्दीवर आलेला नाही. दरम्यान, याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे हे करीत आहेत.