जळगाव-मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना कलम 81 क ची नोटीस बजावण्यात येत आहे.महात्मा फुले,सेन्ट्रल फुले व्यापारी संकुलासह चार व्यापारी संकुलातील गाळेधारकांना नोटीस बजावल्यानंतर आता जुने बीजे व्यापारी संकुलातील 206 गाळेधारकांना पोस्टाद्वारे नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.
मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळेधारकांना नोटीस बजावण्यात येत आहेत.महात्मा फुले व्यापारी संकुलातील काही गाळेधारकांनी धनादेशाद्वारे भरणा केला आहे. कारवाईच्या भीतीपोटी गाळेधारक भरणा करु लागले आहेत. मनपा प्रशासनाच्यावतीने टप्प्याटप्प्याने नोटीस बजावण्यात येत असून आता जुने बी.जे. व्यापारी संकुलातील 206 गाळेधारकांना नोटीस पाठविण्यात आली आहे.