जुन्नरमध्ये संघटनांचा ‘पद्मावती’ला विरोध

0

जुन्नर । पद्मावती चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध करण्यासाठी जुन्नरमधील हिंदुत्त्ववादी संघटना व राजपूत समाजाच्या वतीने जुन्नरच्या तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे, शिवसेना गटनेते दिपेश परदेशी, नगरसेवक समीर भगत, जयसिंग परदेशी, अ‍ॅड. वैभव परदेशी, देवराज डहाळे, बाळासाहेब दुबे, सुनील काळे, पंकज परदेशी, रोहित परदेशी, निलेश परदेशी, अमोल बनकर, आकाश परदेशी आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला
या चित्रपटामध्ये राणी पद्मावती यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. राणी पद्मावती यांचा इतिहास हा शौर्य, त्याग व बलिदानाचा असून तो विकृतपणे समाजासमोर आल्यास समस्त स्त्रीजातीचा व इतिहासाचा अपमान होणार आहे. चुकीचा इतिहास समाजासमोर प्रदर्शीत करण्यास रजपूत समाजाचा व हिंदुत्त्ववादी संघटनाचा प्रखर विरोध राहील, असे निवेदनात महटले आहे. नायब तहसिलदार अर्चना दुधे यांनी शासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले.