जुन्नर-वडज रस्ता दुरुस्तीला वेग

0

जुन्नर । जुन्नर-वडज रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम सध्या सुरू आहे. प्रशासनाने दिलेल्या मुदतीच्या आधी हे काम पूर्ण होईल, असा विश्‍वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला.वडज व नजीकचा संपूर्ण परिसर हा बागायती परिसर आहे. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक अवजारे व वाहने यांची वर्दळ नियमितपणे या रस्त्यावर असलेली दिसते याचाच परिणाम म्हणून हा रस्ता खड्डेमय झालेला दिसतो. परंतु नियमीत डागडुजीने रस्ता सुस्थितीत राहू शकतो. त्यामुळेच या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चालू करण्यात आले असून ते लवकरच पूर्ण होईल. या मार्गाच्या दुरुस्तीची गती पाहून स्थानिक रहिवासी व प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

जुन्नर-वडज रस्ता हा जुन्नर घोडेगाव रस्त्याला पर्यायी मार्ग समाजाला जातो. दोन तालुक्यांना जोडण्याचे महत्त्वाचे काम या माध्यमातून होते. त्यामुळे या रस्त्याचे महत्त्व आणखी वाढत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. या मार्गे स्थानिक शेतीमालाची वाहतूक मुंबई मार्केटपर्यंत केली जाते. म्हणूच हा रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी संबंधित विभागाने कार्यक्षमता दाखवत मुदतीच्या आधी मार्गी लावलेला आहे. जुन्नर-वडज रस्ता वडज गावानजीक जास्त प्रमाणात खड्डेमय झाला होता, परंतु सध्या चालू असलेल्या कामाची गती पाहून हा रस्ता लवकरच खड्डे मुक्त होईल, असे वाटत असल्याचे वडज गावचे सरपंच विजया चव्हाण, उपसरपंच अजित चव्हाण व युवासेनेचे कार्यकर्ते अभिजित वर्पे यांनी सांगितले.