जुन्या घरकुलांमधील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

0

डीवायएसपी डॉ. रोहन यांच्या पथकाची कारवाई

जळगाव: मेहरूण शिवारातील महादेव मंदीराचे समोरील मनपाचे जुने घरकुलात सार्वजनिक जागी सुरू असलेल्या झन्नामन्ना नावाचा मांग पत्त्याच्या जुगारावर शनिवारी छापा टाकून पोलिसांनी रोकड, मोबाईल, दुचाकी असा सुमारे 01 लाख 14 हजार 900 रूपयांचा ऐवज हस्तगत केला. सहायक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या पथकाने ही कारवाई केली. सहायक पोलीस अधीक्षक डॉ. रोहन हे कार्यालयात असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलीस कॉन्सटेबल शुदधोधन ढवळे, पोलीस कॉन्सटेबल योगेश ठाकुर, पोलीस कॉन्सटेबल गोविंद जाधव, पोलीस कॉन्सटेबल महेश पवार, पोलीस नाईक शैलेश चव्हाण तसेच एसडीपीओ कार्यालयातील उपनिरीक्षक मनोहर जाधव,हेड कॉन्सटेबल किरण धमके, हेड कॉन्सटेबल विजय काळे, पोलीस कॉन्सटेबल रविंद्र मोतीराया, पोलीस कॉन्सटेबल अशोक फुसे यांच्या पथकासह डॉ.रोहन तसेच ईआरटी व आरसीपीचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले.


दुपारी साडेतीन वाजता पथकाने घरकुलमध्ये छापा टाकला. याठिकाणी पत्ते खेळणार्‍या तीन जणांना पथकाने ताब्यात घेतले. तर पळून जाणार्‍या तिघांना पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. राजू भोई (38) काळेनगर, याच्याकडून रोख 4390 रूपये तसेच मोबाईल, इम्रान रंगरेज (30) रामेश्वर कॉलनी याच्याजववळ 380रूपये रोख एक मोबाईल, वसीम खशन (23) तांबापुरा याच्याकडून 460 रोख,शाहरूख खशन (23) रा, तांबाबुरा याच्याकडून 1870 रू.रोख, किशोर भोई (37) रामेश्वर कॉलनी याच्याकडून 820 रूपये रोख एक मोबाईल, शितलदास नेनाणी (55) कवरनगर याच्याकडून 420 रूपये रोख, तसेच घोळातील रोकड 1660, चार मोबाईल, एम.एच. 19 सी.पी 4233 तसेच एम.एच. 19 सी.बी. 4231 दुचाकी असा एकुण 1 लाख 14 हजार 900 रूपयांचा ऐवज हस्तगत केला. या प्रकरणी संशयीताविरूध्द एमआयडीसी विरोधात तक्रार
करण्यात आली.