जुन्या घरापासून ते महालापर्यंत क्रिकेटपटूचा प्रवास

0

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचे महत्वाचे फलंदाज,गोलंदाज याच्यासह अनेक क्रिकेट पटू हे खेळात येण्यापुर्वी त्याचे साधे राहणीमान, छोटेघर, होते. मात्र क्रिकेटमध्ये आल्यावर त्यांनी त्याच्याती दाखविलेली क्षमता त्यांनतर त्यांना आकाश ठेगणे झाले.त्यामुळे प्रसिध्द झोतात आल्यानंतर त्यांची रवानगी छोट्या घरातून एका आलिशान घरात झाली.

बायोपिकद्वारे 60 कोटीची कमाई धोनीची
क्रिकेट मधील दिग्गंज व क्रिकेट मधील आयकॉन यांनी आपल्या आयुष्याची सुरवात अत्यशिय छोट्या घरातून,गल्लीबोळातून केलेली आहे.क्र्रिकेट मधील देव म्हणून गणला जणारा सचिन तेंडूलकर याचा प्रवास एका अपॉरमेन्टमधून झाला.तर महेद्रसिंग धोनी क्रिकेट जगतात माही म्हणून ज्याची ओळख आहे.त्याने आपल्या क्रिकेटची सुरवात सरकारी क्वाटेरमधून केली आहे.धोनीने तर गेल्या वर्षी आपल्या बायोपिकद्वारेच नुसते 60 कोटी रूपयांची कमाई केल्याचे सांगितले जाते. त्याच्या या फिल्ममध्ये त्याची पूर्वीचे सामान्य आयुष्य, त्याचे साधे घर आणि ते क्रिकेट ग्राउंड दाखविले गेले. जेथून धोनीचा प्रवास सुरु केला. धोनी, इरफान पठाण, युसूफ पठाण, उमेश यादव, विराट कोहली.सचिन तेडूलकर, रविद्र जडेजा याच्या सुरवात एका छोट्याश्या घरातून झाली आज ते क्रिकेट जगामध्ये सर्वाच्च स्थानावर असून कोट्यवधी रूपये जाहिराती,आयपीएलमधून कमवित आहे.

भारतीय संघातील यशस्वी फलंदाज जे आज उंच शिखरावर व प्रसिद्धीच्या सर्वाच्च पदावर बसलेले आहे. त्यांनी आपल्या यशस्वी जिवनाची कारकीद या गल्ली बोळातील क्रिकेटपासून सुरुवात झाली. त्यांनी सातत्ये व परिश्रम यांच्या जोरावर जगातील सर्वउत्कृष्ठ फलंदाज गोलंदाज किंवा अष्ठपैलु खेळाडूंची भुमीका पार पडीत आहे. छोट्या घरातून निघून आज बंगल्यात गेलेला माही आजही गल्ली क्रिकेटच्या आठवनी काढीत असतो. तर सचिन आपल्या कारक्रीद्रीची सुरुवात कशी झाली व कशाप्रकारे आपण इथपर्यंत पोहोचलो हे सांगतांना आई वडीलांबरोबर राहत असलेल्या आर्पाटमेन्टचा उल्लेख करतांना कधीच विसरत नाही.