नंदुरबार। जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शासकीय कर्मचार्यांना जुनी पेंशन योजना पूर्वीप्रमाणे कार्यान्वित करावी यासाठी जिल्हाधिकारी कातर्यालायासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारणीत 2005 नंतर राज्यातील सेवेत लागलेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना लागू असणारी नवी पेंशन योजना हि असन्यायकारक आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याची चर्चा करण्यात आली.
राज्यभर समितीतर्फे आंदोलन
2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचार्यांना पूर्वीची अस्तित्वात असणारी जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी यासाठी राज्यभर प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले होते. यानुसार नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कापुरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले. शिष्टमंडळात पदवीधर शिक्षक संघटनेचे पुरुषोत्तम काळे,हंसराज पाटील शिक्षक समितीचे नेहरू नाईक, शेखजी वळवी, शांतिलाल अहिरे, किरण मोहिते, राजाराम देवरे, दिपक पानपाटील, सिध्दार्थ बैसाने आदींचा समावेश होता. या आंदोलनात राहुल पवार,कल्पेश राजपूत,अनिल करांडे,स्मिता बुधे,कल्पना राठोड आदींसह जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.