जुन्या पेन्शनसाठी संगीता शिंदे यांचा उपोषणाचा इशारा

0

च्च न्यायालयाच्या विधितज्ञांनी केले मार्गदर्शन
नवापूर ।
शासनाने 2005 नंतर नियुक्त शिक्षक तसेच कर्मचार्‍यांना नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. परंतु काही प्रमाणात अनुदानावर असलेल्या आणि 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचार्‍यांना जुन्या पेंशनऐवजी नवीन पेन्शन योजना लागू करून शासनाने मोठा अन्याय केला आहे. शिक्षकांमध्ये शासनाविरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे. आता शिक्षकांना न्याय मिळून देण्यासाठी आगामी अधिवेशनात बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा इशारा शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी दिला आहे. टाऊन हॉल येथे शिक्षण संघर्ष संघटनेच्यावतीने आयोजित जुनी पेंशन योजना चर्चासत्रादरम्यान शिक्षकांना संबोधित करताना त्या बोलत होत्या.

उच्च न्यायालयाने शिक्षकांच्या जुन्या पेंशन योजनेसंदर्भातील याचिका फेटाळून लावल्यानंतर शिक्षण संघर्ष संघटनेने एल्गार पुकारला. त्यासाठी शिक्षण बंधू भगिनींना न्यायालयीन प्रक्रिया आणि भविष्यात कुठली कायदेशीर पावले उचलावी, यासाठी संघटनेच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी शिक्षण संघर्ष संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रा.अशोक भराड होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उच्च न्यायालयाचे विधीज्ञ अ‍ॅड.सुरेश पाकळे आणि अ‍ॅड.गजानन क्षीरसागर उपस्थित होते.

18 जूनपासून आमरण उपोषण
जुन्या पेन्शनचा लढा आता तीव्र केल्याशिवाय पर्याय उरला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात मुंबई येथील आझाद मैदानावर मी 18 जूनपासून बेमुदत उपोषणाला बसणार असून राज्यातील सर्व विभागातून शिक्षण बंधू, भगिनी त्या आंदोलनात सहभागी होतील. तुमच्या आमच्या कुटुंबाच्या हितासाठी जुनी पेंशन आपल्याला हवी आहे. त्यासाठी आता शेवटच्या लढाईत सहभागी व्हा, असे आवाहन शिंदे यांनी केले.