पोलादपूर । महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना रायगड, महाड, पोलादपूर कार्यकारिणीच्या वतीने जिल्हा सचिव मारोती भोसले जिल्हा उपाध्यक्ष माधव काळे महाड तालुकाअध्यक्ष गोविंद साळवे यांच्या नेतृत्वाखाली आ. भरतशेठ गोगावले यांना जुन्या पेन्शनची मागणी अधिवेशनात करावी यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. नव्या अन्यायकारक अंशदायी पेंन्शन योजनेत ना ग्रच्युईटी नाही. निवृती पेन्शन ना शासनाचा हिस्सा ना, शासनाचा व्याज. गेली 2005 ते 2017 या बारा वर्षांत शासनाकडून हुकूमशाही पद्धतीने एकतर्फी कपात केली जात आहे.
शासनाने अद्यापपर्यंत या योजनेत एकही रुपयाचा हिस्सा दिला नाही यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात खूप तफावत असून काही जिल्ह्यांत अंशदायी पेंन्शनची एक कपात, तर काही जिल्ह्यांत दोन-दोन कपाती होत आहेत. सर्व मुद्दे आमदार भरतशेठ गोगावले यांना दिलेल्या निवेदनात होती. त्याचबरोबर अंशदायी जाचक पेंन्शन योजना कायमची बंद करून मूळची जुनीच 1982ची पेन्शन योजना लागू करावी, अशी निवेदनातून मागणी करण्यात आली.