जुन्या पोलीस लाईन परिसरात आग

0

जळगाव । चिमुकले राममंदिराच्या मागील पोलीस मुख्यालय परिसरातील जुन्या पोलीस लाईनमध्ये रविवारी आग लागली. या आगीत परिसरातील गवताने पेट घेतल्याने आग झपाट्याने वाढली. अनेक वृक्षांना आगिची झळ पोहोचल्याने पालापाचोळा त्यात खाक झाला़ मनपाचे दोन अग्निशमन बंब तसेच पोलीस प्रशासनातील एक बंब घटनास्थळी मागवून तिघांच्या संयुक्त प्रयत्नातून ही आग विझविण्यात आली. परिसरात धुराळा पसरला होता.

जुन्या पोलीस लाईनमध्ये कोणीही वास्तव्यास नाही.त्यामुळे परिसर गवतकचर्‍याने व्यापला गेला आहे. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही आग अचानक लागली. हा प्रकार पोलीस मुख्यालयातील कर्मचार्‍यांच्या लक्षात येताचत्यांनी तत्काळ मनपाच्या अग्नीशमन विभागास खबर दिली. काही क्षणात एकापोठएक असे दोन अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले. तर पोलिसांच्या एका बंबानेहीघटनास्थळी येऊन आग विझविली. या परिसराला लागूनच पोलीस मुख्यालय, पोलीस रूग्णालय तसेच वाहतूक शाखेचे कार्यालय आहे.