जुन्या प्रकल्पाचे अनुभव कडू मात्र नवीन प्रकल्पाकडून अपेक्षा

0

माजी राज्यमंत्री एकनाथराव खडसे यांनी सरकारला सुनावले खडे बोल

दीपनगर :- राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून विजेची कमतरता आहे. नवीन प्रकल्प उभे राहत असले तरी पर्यावरणाबाबत उपाययोजना होत नाही. भुसावळकरांना मागील प्रकल्पाचे अतिशय कडू अनुभव असून आता नवीन प्रकल्पात तरी सीएसआर वाढवून कामे व्हावी, असे खडे बोल माजी राज्यमंत्री एकनाथराव खडसे यांनी सरकारला कार्यक्रमात सुनावले.

दीपनगर 660 नवीन प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. खडसे म्हणाले की, प्रकल्पात स्थानिकांच्या जमिनी गेल्याने त्यांना प्रकल्पात काम मिळण्यासह कंत्राट मिळणे गरजेचे आहे. बाहेरच्या लोकांच्या कामास आमचा विरोध असेल असे त्यांनी ठासून सांगत भेलच्या अधिकार्‍यांनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात सर्वाधिक प्रकल्प भुसावळला असून पाण्याचे तसेच हवेचे प्रदूषण थांबायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करत सीएसआर निधी जादा प्रमाणात द्यावा, असेही ते म्हणाले.