नंदुरबार- मागील भांडणाच्या कारणावरून एका वृद्धाचा खून करण्यात आल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील खोडीचा पाटली पाडा गावात घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील जुन्या भांडणाच्या वादातून रेमा मोत्या वसावे (55) या वृद्धाला कुर्हाडीचा घाव घालून ठार मारल्याची घटना घडली. याबाबत वनसिंग रेमा वसावे यांनी मोलगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आमस्या पारता वसावे, हिरालाल बावा वसावे, विरजी सोन्या वसावे, बोटक्या मोत्या वसावे या चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल.