पहूर : जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने वाकोदच्या तरुणाच्या डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
वाकोद गावातील तरुणाने केली मारहाण
सागर कैलास राऊत (24, शिवाजी नगर, वाकोद, ता.जामनेर) हा कुटुंबियांसह वास्तव्याला असून शेती काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. जुन्या भांडणाच्या कारणावरून 13 फेब्रुवारी रोजी गावातील गणेश प्रकाश भोसले याने शिवीगाळ करून हातात असलेला दगड डोक्याला मारला. यात सागर हा जखमी झाला. त्याला तातडीन जामनेर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी पहूर पाोलिस ठाण्यात सागर राऊत याच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी गणेश राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक सुभाष पाटील करीत आहे.