जुन्या वादाच्या कारणावरुन महिलेस बेदम मारहाण

0

जळगाव । तालुक्यातील कुसुंबा येथील तुळजाई नगरात राहणार्‍या 35 वर्षीय महिलेला मागील कारणाच्या वादातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी तिघांविरुध्द औद्यागिक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुसुंबा येथे तुळजाईनगरातील अरुणाबाई गोटू पवार यांना मंगळवारी 25 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास कमलाबाई दिलीप पाटील, निलेश दिलीप पाटील, बबलु दिलीप पाटील तिघे रा. कुसुंबा यांनी मागे झालेल्या वादातून अरुणाबाई हिला चापटा, बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. मारहाणीत अरूणाबाई ह्या गंभीर झाल्या. यावेळी परिसरातील काही नागरिकांनी मध्यस्थी घेतल्यानंतर हा वाद मिटविला. मात्र अरुणाबाई पवार ह्या जखमी आहेत. तिघांविरूध्द गुन्हा दाखल केले आहे.