यावल- तालुक्यातील चुंचाळे येथील विविध कार्यकारी सेासायटीसमोर जुन्या वादातून एकास चौघांनी मारहाण केल्याची घटना 13 रोजी सकाळी 10 वाजता घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार दगडू सुपडू तडवी (30, रा.हिंगोणा) यांना संशयीत आरोपी अजीज रज्जाक तडवी, फत्तु रज्जाक तडवी, कालू तडवी, रहेमान अन्वर तडवी (सर्व रा.चुंचाळे) यांनी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून मारहाण केली. आरोपी अजीजने हातातील लोखंडी आसारीने फिर्यादीच्या पाठीवर, डाव्या पायाच्या बरगडीवर, डाव्या हाताच्या दंडावर मारहाण केली तसेच अन्य आरोपींनी शिवीगाळ करीत दमदाटी करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. जळगाव शहर पोलिसांकडून कागदपत्रे आल्यानंतर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विकास काळे करीत आहेत.