जळगाव । जुन्या वादातून जिल्हा बँकेतील कर्मचार्याच्या गाडीची तोडफोड करुन मारहाण केली असून यात कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे़ याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सुत्रांच्या माहितीवरुन, रविंद्र साहेबराव साळुंख्ये (वय-45 रा़ विद्यानगर, मानराज पार्क) हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेत कारकुन म्हणून नोकरीला आहेत. सुमारे दोन वर्षा पुर्वी चंद्रकांत शंकर कापसे यांच्याशी दांडेकर नगर भागात असलेल्या प्लॉटवरुन त्यांचा वाद झालेला होता़
अशी घडली होती घटना
त्यानंतर 23 मे 2018 रोजी रात्री रविंद्र साळुंखे हे त्यांच्या मालकीची मारुती सुझूकी स्वीफ्ट क्र.एम.एच.19 बी.यु.8172 ह्या गाडीने पिंप्राळा बाजार रोडने घरी जात असतांना चंद्रकांत शंकर कापसे, सोनु चंद्रकांत कापसे, विशाल चंद्रकांत कापसे, दगडू पाटील, चंद्रकांत कापसे यांचा भाचा सुनील पाटील अशा 8 लोकांनी माझ्या गाडीला अडवली व बेसबॉलच्या स्टीकने गाडीच्या मागील काचावर चंद्रकांत कापसे यांच्या भाच्याने वार करुन काच फोडला व चंडकांत कापसे यांनी गाडीचा दरवाजा उघडून सोनू कापसे व विशाल कापसे यांनी रविंद्र साळुंखे यांना बाहेर काढले. त्यावेळी चंदकांत कापसे व त्यांचे दोन मुले यांनी साळूंखे यांना मारहाण केली.
या मारहाणीत त्यांच्या खिशातील 8 हजार रुपये व हातातील सोन्याची अंगठी हरवली असून त्यांनी फोन लावण्यासाठी काढलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल देखील झटापटीत हरवला आहे. यावेळीच पोलिसांची पेट्रोलिंगची गाडी या ठिकाणी आल्याने सदर सर्व जण पडून गेले़ त्यानंतर पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती देत रविंद्र हे त्यांची गाडीघेवून रामानंद नगर पोलीस स्टेशनला आले़ त्यानंतर त्यांना मारहाणीत मानेवर, नाकावर, डोक्यावर व उजव्या डोळ्यावर जबर मार बसला आसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले़ उपचार पुर्ण झाल्यानंतर त्यांनी द़ि28 रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिस स्टेशनला आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.