An old quarrel erupts anew: youth injured by machete शेंदुर्णी : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर लोखंडी विळ्याने वार करून जखमी केल्याची घटना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे घडली आहे. याबाबत रविवार 11 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या वादातून केला हल्ला
सागर सुभाष ढगे (28, वाडी दरवाजा शेंदूर्णी, ता.जामनेर) हा तरुण परीवारासह वास्तव्याला आहे. गावात राहणारे समाधान बळीराम पाटील आणि संदीप रामदास काटोले यांनी जुन्या भांडणाची पोलीसात तक्रार दिल्याच्या कारणावरून सागर याला शनिवार, 10 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता गावातील पाण्याच्या टाकीजवळ पकडून समाधान पाटील व संदीप काटोले या दोघांनी लोखंडी विळ्याने मानेवर वार करून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत सागरला जामनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात सागर ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी समाधान बळीराम पाटील आणि संदीप रामदास काटोले दोन्ही रा. वाडी दरवाजा शेंदुर्णी या दोघांनी विरोधात रविवारी 11 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील समाधान पाटील याला पोलिसांनी अटक केली तर दुसरा पसार आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.