पारोळा : पारोळा तालुक्याततील एका गावात महिलेचा जुन्या वादातून विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जुन वादातून महिलेचा विनयभंग
जळगाव तालुक्यातील एका गावात 45 वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेतातील काम करून आपला उदरनिर्वाह करते. शनिवार, 11 जून रोजी महिला आपल्या घरी असतांना गवातील दीपक रवींद्र हिवरे, मंगल रवींद्र हिवरे आणि सोनी रवींद्र हिवरे या तिघांनी मागील भांडणाचे कारणावरून महिलेशी वाद घातला. त्यानंतर शिविगाळ करून अंगावरील साडी ओढून अश्लिल शिवीगाळ करून विभयभंग केला व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. महिलेने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विजय भोई करीत आहे.