जुन्या वादातून शौचालयात बसलेल्या इसमास मारहाण

रावेर : जुन्या भांडणाच्या रागातून शौचालयास बसलेल्या तक्रारदारास मारहाण करण्यात आली. ही घटना 1 रोजी दुपारी दोन वाजता रसलपूर-केर्‍हाळा रस्त्यावर घडली. या प्रकरणी एकाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार गोकुळ बाळू तायडे (39, रसलपूर) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी अनिल दयाराम तायडे (रसलपूर, ता.रावेर) याने फिर्यादी हा शौचास बसलेला असताना लोखंडी फावड्याने डोक्यावर, उजव्या हाताच्या कमरेवर व डाव्या मांडीवर लोखंडी फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. तपास हवालदार सतीश दिनकर सानप करीत आहेत.