जळगाव : जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव येथील माहे एप्रिल, 2014 ते नोव्हेबर, 2016 या कालावधी मधील जुन्या वृत्तपत्रांची रद्दी म्हणून विक्री करावयाची आहे. तसेच इन्व्हर्टरच्या निरोपयोगी, खराब झालेल्या बॅटरी दोन नग यांची विक्री करावयाची आहे. तरी इच्छूक खरेदीदारांनी आपले दरपत्रक जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव या नावे तयार करुन जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, 3 रा टप्पा, पहिला माळा, जळगाव या पत्यावर बंद लिफाप्यत गुरूवा 22 डिसेंबर, 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत पाठवावीत. वृत्तपत्र रद्दी व बॅटरी दोन नग यांचे वेगळे दरपत्रक सादर करावे. लिफाफ्यावर वृत्तपत्र रद्दी दरपत्रक अथवा इन्व्हर्टर बॅटरी दरपत्रक असा उल्लेख केलेला असावा. दरपत्रके मंजूर, नामंजूरीचे अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव यांना राहतील, कार्यालयातील वृत्तपत्रांची रद्दी व दोन बॅटर्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत पहावयास मिळतील, असे जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.