वॉशिंग्टन : १६ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या व पंख असलेल्या सस्तन प्राण्याचा शोध वैज्ञानिकांना लागला आहे. जुरासिक काळातील हा प्राणी सरकट असे आणि तो झाडांमध्ये वास्तव्य करीत असे.
चीनमध्ये सापडलेल्या दोन जीवाश्मांवरून लक्षात येते की सस्तन प्राण्यांचा पंख असलेला हा पूर्वज उत्क्रांत व्हायला १० कोटी वर्षांचा कालावधी गेला. १६ कोटी वर्षे जुने असलेले मायोपेटाजिअम फरक्युलीफेरम आणि विलेव्हालोडॉन डिप्लोमिलॉस हे सरकटणारे सस्तन प्राणी होते. त्यांना लांब माड्या, हात आणि लांब पायाची बोटे होती. पंख सदृश्य पडद्याने ते झाडाझाडांवरून सरकत जात असत.
नैसर्गिक स्थितीनुसार किंवा अन्य कारणांमुळे शारीरिक ठेवण उत्क्रांत होते. जमिन आणि आकाश यांच्यात विहारासाठी प्राण्यांमध्ये बदल झाले. जमिनीवरील प्राण्यांना जे अन्न मिळत नव्हते ते या पंखवाल्या सस्तन प्राण्यांना झाडांवरून सरकटता येण्यामुळे मिळत असे.
हे जीवाश्म चीनमध्ये तियाओजीशान येथे सापडले. सस्तन प्राण्यांची हा प्रजाती नष्ट झाली. सध्याच्या सरिसृप (सरपटणारे) प्राण्यांची शारीरिक ठेवण या प्राण्यांशी संबंध सांगते. फरक्युलीफेरम आणि विलेव्हालोडॉन डिप्लोमिलॉस जुरासिक काळात रहात तेव्हा नेचा आणि जिम्नोस्पर्म प्रजातीची झाडे होती. आताचे सरपटणारे सस्तन प्राणी तृणभक्षी आहेत. ते बिया, फळे आणि फुलझाडांचे भाग खातात.