उत्तर आयर्लंडमधील दोन बहिणी शरीर शिळेसारखे बनण्याच्या शारीरिक व्याधीने ग्रस्त आहेत. वीस लाखात एक अशी केस आढळू शकते अशी संभाव्यता असते.
झो बक्सटन आणि ल्युसि फ्रेटवेल या जगातील तीन जुळ्यांपैकी एक आहेत की ज्यांना दगडासारखे शरीर बनण्याच्या रोगाने पछाडले आहे. फायब्रोडिस्प्लेसिया ओसीफिकन्स प्रोग्रेसिवा (एफओपी) अशी ही स्थिती असते. यात स्नायु आणि स्नायुबंधांची जागा हाडे घेतात.
या बहिणी आता अत्यंत कठिण अवस्थेत जगत आहेत. त्यांना मूल हवंय. पण हा रोग पुढे संक्रमित होईल अशी भितीही आहे. आता वैज्ञानिक या रोगावर औषध शोधीत आहेत. त्या प्रयोगात या बहिणी सहभागी होत आहेत.
एफओपी ही एक अनुवांशिक शरीर विकृती आहे आणि कालोघात ती गंभीर बनत जाते. स्नायुंमध्ये हाडे निर्माण होतात. पायाचा अंगठा जन्माच्यावेळी खूपच लहान असतो. जबड्याला बाधा झाली की काही खाता येत नाही आणि इतर शरीरात पसरली की शरीर हलवता येत नाही. एफओपीवर उपाय नाही फक्त वेदनाशमनासाठी औषधे देता येतात.