जूना खेडी परिसरातून घरासमोरून दुचाकी लांबविली

जळगाव : शहरातील जूना खेडी परीसरातून चोरट्यांनी अंगणात लावलेली 35 हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबवली. शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शनीपेठ पोलिसात गुन्हा
नेमीचंद लालचंद शर्मा (52, रा.दत्तनगर, डी.एन.कॉलेज मागे, जुना खेडी, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. फर्निचरचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. 1 मार्च रोजी दुपारी 12 ते 1 वाजता दरम्यान त्यांची मालकीची (एम.एच. 19 डी.एल 7951) क्रमांकाची दुचाकी त्यांनी पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. नेमीचंद शर्मा यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिल्यानंतर बुधवार, 2 मार्च रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल इंदल जाधव करीत आहे.