मुंबई: जॅकलिन फर्नांडिसचा एक नवीन लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचा हा पारंपरिक लूक पाहून ती काय करतेय याबद्दलची जिज्ञासा चाहत्यांमध्ये वाढली आहे.
ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये जॅकलिन साडीमध्ये, कमीत कमी मेकअप आणि चेहऱ्याचा भाग पदराने झाकलेला एशा अवतारात दिसते. गतकाळाची आठवण करुन देणारा हा तिचा लूक चाहत्यांना चांगलाच पसंत पडलाय. तिचा हा नवा अवतार कशासाठी आहे हि खळबळ उडाली आहे. परंतु निश्चितपणे आगामी चित्रपटातील हा लूक असावा असा कयास बांधला जातोय.