जेईई अॅडव्हान्स’ परीक्षेचा निकाल जाहीर

0

नवी दिल्ली- देशभरात आयआयटी, एनआयटी आणि तत्सम संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई अॅडव्हान्स’ परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. आयआयटी कानपूरने हे निकाल घोषीत केले आहेत. अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in यावर जाऊन विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. एकूण २ लाख २४ हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरले होते.

२० मे रोजी आयआयटी कानपूरच्या वतीने देशभरातील विविध केंद्रांवर हा परीक्षा घेण्यात आली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर आता १५ जूनपासून जागा वाटपाचा प्रक्रिया सुरू होणार आहे. गेल्या वर्षी आयआयटी मद्रासकडून देशभरातील विविध केंद्रांवर हा परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी ५० हजार ४५५ जण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते.