जेईई व नीट प्रवेश परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

0

शिरपूर । तालुक्यातील वाघाडी येथील आर.सी.पटेल उच्च माध्यमिक आश्रमशाळेत 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी जेईई व नीट तसेच एम.एच.सी.ई.टी. प्रवेश परीक्षे बाबत मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.अंकित झा(आसाम), प्रा.पांडे (उत्तरप्रदेश), प्रा. प्रद्यन कुमार (पश्‍चिम बंगाल), आय.आय.टी. पॉईंट शिरपूरचे मार्गदर्शक यांनी जे.ई.ई, नीट परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, विविध प्रश्‍नप्रकार, तसेच महत्वाची संदर्भ पुस्तके व भविष्यातील अभियांत्रिकी व मेडिकल क्षेत्रातील नाविन्यपूर्ण रोजगाराच्या संधी यांबाबत सविस्तर माहिती दिली. प्राचार्य ए.पी.ठाकरे, आमदार अमरिशभाई पटेल, भुपेशभाई पटेल, राजगोपाल भंडारी, प्रा. के.जे.राजपूत, प्रा.एन.आर.पाटील, प्रा.पी.आय.बडगुजर, प्रा.ए.पी.माळी, प्रा.टी.ए.ओझरवाला, प्रा.सी.पी.माळी, प्रा.एस.पी.भावसार, प्रा.कैलास पाटील, प्रा.एल.बी.चौधरी, प्रा.सी.पी.चव्हाण, प्रा.एस.पी.चौधरी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक ए.पी.ठाकरे यांनी केले. आभार कैलास पाटील यांनी मानले.