जेएनएम मॅरेथॉनमध्ये जळगाव रनर्सचा सहभाग

0

जळगाव । रनिंग सिसनची पहिली जे.एन.एम. मॅरेथॉन 11 जून रोजी ठाणेे येथे संपन्न झाली, यावर्षी जळगाव रनर्सच्या धावपटूंनी यात सहभाग नोंदवला आहे.

जळगाव रनर्स ग्रुपचे सदस्य डॉ.राहुल महाजन (58 मि.), गीतेश मुंदडा (65 मि.)पवन गोंधुळे (69 मि.), प्रशांत गांधी (71 मि), विवेक बागरी (77 मि.), राहुल झोपे (70मि.) यांनी ही 10 कि.मी रन पूर्ण केली. मॅरेथॉन पूर्ण केल्यास मुंबई येथील एस.सी.एम.एम 2018 साठी पात्र ठरणार आहे. यात जळगाव रनेर्स ग्रुपचे सर्व सहभागी सदस्य यशस्वी झाले आहेत.