मू.जे. महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा
जळगाव: जेनएनयु विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा विद्यार्थी संघटनांतर्फे मोर्चा काढुन आणि जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला आहे. विद्यार्थी संघटनांनी मु. जे. महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.
जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर काल रात्री हल्ला झाला. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. तसेच हा हल्ला अभाविपच्या कार्यकर्त्यांची केला असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. दरम्यान या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी आज मु. जे. महाविद्यालयापासून महाराणा प्रताप चौक, स्वातंत्र्य चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ करण्यात आला. याठिकाणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी कल्पीता पाटील, मुकेश पाटील, मुजीब पटेल, जकी पटेल, दिपाली भालेराव, विकास मोरे, धनश्री पवार, अलफैज पटेल, अविनाश तायडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.