जेएनयूमधील देशविरोधी घोषणेचा तपास पूर्ण; १० जणांवर दोषारोप !

0

नवी दिल्ली- दिल्लीतील जेएनयूमध्ये ९ फेब्रुवारी २०१६ रोजी विद्यार्थी संघटनांनी देशविरोधी घोषणाबाजी केली होती. त्याबाबत तपास सुरु होते, तो तपास पूर्ण झाला आहे. याप्रकरणी आज विशेष पथकाकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या दोषारोपपत्रात जेएनयुच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार, सैयर उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्यासह १० जणांचा समावेश आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात हे दोषारोपपत्र सादर केले जाणार आहे.

विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व कन्हैय्या कुमार यांनी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठा आवारातील या आंदोलनासाठी कुठलिही परवानगी घेण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी तब्बल ३ वर्षांनी आज दोषारोपपत्र दाखल करण्यात येत आहे. आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली, और खलिद बशीर भट हे जम्मू आणि काश्मीर येथील रहिवासी आहेत.