मुंबई: रविवारी दिल्लीतील जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त केला जातो आहे. महाराष्ट्रात देखील याचे पडसाद उमटले आहे. पुणे, मुंबई येथे आंदोलने होत आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. रात्रभर या ठिकाणी धरणे दिले. हे आंदोलन आता मागे घेण्यात आले आहे. ‘ऑक्युपाय गेटवे’ या मोहिमेतून विद्यार्थ्यांचे लोंढे ‘गेटवे’कडे वळू लागले. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना गेट वे ऑफ इंडिया या परिसरातून हटवले असून त्यांची रवानगी आझाद मैदानात करण्यात आली होती. परंतु काही वेळानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
पोलिसांनी कोणत्याही आंदोलकाला ताब्यात घेतले नसून त्यांना केवळ आझाद मैदानात हलवण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली. दोन दिवसांपूर्वी जेएनयूमध्ये जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे.