नवी दिल्ली: नेहमीच चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात असलेली दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरात 5 जानेवारीला विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली होती. दिल्लीसोबातच मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला. यानंतर आता जेएनयू हिंसाचार प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि गुगलला नोटीस बजावली आहे. हिंसाचार प्रकरणी कॅम्पसमध्ये घडलेल्या घटनेबाबत संबंधित डेटा जतन करुन ठेवण्याच्या मागणीसाठी दिल्ली हायकोर्टाने फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि गुगलला नोटीस बजावली आहे.