जेएसडब्ल्युई संस्थेतर्फे एक हजार विद्यार्थीनींना ब्युटी प्रशिक्षण

0

नंदुरबार। येथील जेसीकेआरसी स्पा अ‍ॅण्ड वेलनेस एज्युकेशन (जेएसडब्ल्युई) संस्थेतर्फे विद्यार्थीनींसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेेंतर्गत रिकगनेशन ऑफ प्रायर लर्निंग कोर्स (आरपीएल) हा कोर्स राबविण्यात आला. यात सुमारे एक हजार विद्यार्थीनी यशस्वीरित्या हा कोर्स पूर्ण केला. येथील ज्येष्ठ समाजसेवक हिरालालकाका चौधरी यांची कन्या व उद्योजक रविंद्रबापू चौधरी, आ. शिरीषदादा चौधरी यांची बहिण रेखाताई चौधरी यांनी समाजसेवेचे व्रत स्विकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नंदुरबार येथे जेएसडब्ल्युई नावाने ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. या संस्थेत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेेंतर्गत रिकगनेशन प्रायर लर्निंग कोर्स हा कोर्स राबविण्यात आला. यात प्रशिक्षणार्थींना ब्युटी पार्लर कोर्सचे शासकीय प्रमाणपत्र दिले जाते.

यांची होती उपस्थिती
यावेळी नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील सुमारे एक हजार मुलींनी यशस्वीरित्या हा कोर्स पूर्ण केला. यशस्वी प्रशिक्षणार्थींना जेएसडब्ल्युई केंद्र, पी.पी.पाटील विद्यालय, कोकणी हिल, नंदुरबार येथे झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा.डॉ.हिनाताई गावित, अमळनेरचे आ.शिरीषदादा चौधरी, लायनेस क्लबच्या प्रांताध्यक्षा डॉ.तेजल चौधरी, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सविता जयस्वाल, महेंद्र फटकाळ, जेएसडब्ल्युईचे विशाल कुलकर्णी, क्षितिजा खरे, माऊली पाटील, हर्षा चौधरी आदी उपस्थित होते.