जेएसपीएम फार्मसी इंस्टीट्यूटमध्ये पदवी प्रदान

0

कॉलेज कट्टा या ई मॅगझिनचे प्रकाशन

पिंपरी : ताथवडे येथील जयवंत इंस्टिट्यूट ऑफ़ फार्मसी कॉलेजचा प्रथम पदविका प्रदान सोहळा व माजी विद्यार्थी मेळावा रंगला होता. यावेळी जेएसपीएम ताथवडे शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. पी. पी. विटकर, इंडोफिल कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. जयंत चांदोरकर, प्राचार्य प्रशांत हंबर, कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. वर्षा कटारे आदी उपस्थित होते.

फार्मसी क्षेत्रात बदल
डॉ. चांदोरकर म्हणाले की, पूर्वीपेक्षा हल्ली फार्मसी क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. मुलांचा कल वाढला आहे. या क्षेत्रात नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. यावेळी ज्योती चौधरी संपादित कॉलेज कट्टा या ई मॅगझिनचे प्रकाशन करण्यात आले. सहभागी झालेल्या 350 माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगत मार्गदर्शन केले. नृत्य, नकला असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. दिवसभराच्या कार्यक्रमात निकिता कुंभार, ममता चौधरी, कोमल महाडिक, गीता चौधरी, दिव्या चौधरी, निशा सोनवणे यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. सुधा पुरी यांनी आभार मानले. माजी विद्यार्थी संघटनेचे धवल घुगे यांनी अहवाल सादर केला.