डीएनए रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही न्याय मिळत नसल्याने अखेर न्यायालयाकडे मृत्युदंडाची मागणी
नवी मुंबई । नेरूळ एमजीएम शाळेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात ठाणे जेलमध्ये असलेल्या हरिशंकर शुक्ला या कैद्याने ठाणे जेलमध्येच आमरण उपोषण सुरू केले असल्याची माहिती त्याची पत्नी अंजली शुक्ला यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. डीएनए रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही आपल्याला न्याय मिळत नसल्याने अखेर न्यायालयाकडे मृत्युदंडाची मागणी करत हरिशंकर शुक्ला यांनी उपोषणाला सुरवात केली असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.
शाळेत शिकणार्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्या प्रकरणी हरिशंकर शुक्ला याला डिसेंबरमध्ये दिल्लीतून अटक करण्यात आली. पीडित मुलीच्या पोटात तीन ते चार महिन्यांचा गर्भ असल्याने या ,प्रकरणात डीएनए टेस्ट करण्याची मागणी समोर आली. त्याच वेळी हरिशंकर शुक्ला यांच्या पत्नी अंजली शुक्ला यांनी माझे पती निर्दोष असून या प्रकरणात त्यांची डीएनए टेस्ट करा, पण त्याच बरोबर पीडित मुलीची आणि तिच्या मित्राचीही डीएन टेस्ट करा, अशी मागणी केली होती.
निर्दोष असताना जाणीपूर्वक त्रास
याकडे गांभीर्याने न पाहता शुक्ला यांना जाणीवपूर्वक अडकवले जात असल्याचाही आरोपही अंजली शुक्ला यांच्याकडून करण्यात आला आहे. निर्दोष असतानासुद्धा जाणीपूर्वक त्रास देण्यात येत असल्याने आणि परिवाराची फरफट होत असल्याने अखेर ठाणे जेलमध्ये असलेल्या हरिशंकर शुक्ला यांनी चीफ जस्टिसला पत्र लिहीत न्याय व मृत्युदंडाची मागणी केली आहे. आणि जेलमध्येच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
पतीला जाणीवपूर्वक अडकवले जात असल्याचा आरोप
त्यावेळी वातावरण तंग असल्याने फक्त हरिशंकर शुक्ला याचीच डीएनए टेस्ट करण्यात आली. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या प्रकरणात माझ्या पतीचा हात नसल्याचे उघडकीस आले असून पीडित मुलीचीही डीएनए टेस्ट व्हायला हवी अशी मागणी अंजली शुक्ला हिने लाऊन धरली. माझ्या पतीला जाणीवपूर्वक अडकवले जात असल्याचाही आरोप तिने केला. जर हरिशंकर शुक्ला यांचा डीएन टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तर पीडित मुलीच्या पोटात कोणाचा गर्भ आहे, पोटात असणार्या त्या बालकाचा बाप कोण याचाही खुलासा व्हायला हवा, अशी मागणी अंजली शुक्ला यांनी केली होती.