जेवणावरून वाद; पत्नीने केला पतीचा खून

0

जुनागढ : पती-पत्नीमध्ये वाद होणे हे काही नवे नाही. परंतु, गुजरातच्या जुनागढ भागात अशाच वादामुळे पतीला जीव गमवावा लागला आहे. जेवणावरून सुरू झालेल्या या वादाचा अंत पतीच्या मृत्यूने झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. गुजरातमधील केशोध तालुक्यात रानींगपूरमध्ये राहणारे जगदीश झाला यांना दारू पिण्याचे व्यसन होते. या व्यसनामुळे जगदीश आणि पत्नी शांता यांच्यात प्रचंड वाद व्हायचे. सोमवारी दुपारीच जगदीश दारू पिऊन घरी आल्याने शांता वैतागली. जगदीशने तिला जेवण मागितले. शांताने थोडावेळ थांबण्यास सांगितले. जेवण द्यायला उशीर झाल्याने जगदीशने शांताशी भांडायला सुरूवात केली. त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात शांताने घरी ठेवलेली पिस्तूल उचलली आणि त्याच्या डोक्यात घातली. जगदीशच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव सुरू आला आणि जागच्या जागीच त्याने प्राण सोडले.

जगदीश आणि शांताच्या मुलाने हिरेन झालाने आपल्या आईच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी जगदीशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, शांताला अटक करण्यात आली आहे.