भडगाव (प्रतिनीधी ): समाजातील वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्याच्या अनेक समस्या असतात. वाढत्या वयामुळे दूर बाहेर तपासणीस जाण्याच्या देखील अडचणी असतात. या सर्व बाबींचा विचार करून येथील जागृती मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सव अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जागृती चौकात करण्यात आले होते. जळगांव येथील रेडक्रॉस सोसायटी यांच्या मोबाईल अम्ब्युलन्स द्वारे परिसरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना औषधें देखील वितरित करण्यात आली. या अंतर्गत ई. सि. जी., शुगर, बी. पी., हिमोग्लोबिन टेस्ट करून वैद्यकीय सल्ला देण्यात आला. शिबिरात 81 जेष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या साठी रेडक्रॉस सोसायटी चे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सुरळकर, जनसंपर्क अधिकारी सौं. उज्ज्वला वर्मा, सहाय्यक रवींद्र जाधव, मंगेश ओतारी, अन्वर खान यांचे अनमोल सहकार्य लाभले.शिबीर यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्यकर्ते सुरेश कासार, सुनील कासार, अन्वर पठाण, उमेश जयस्वाल, मंदार कासार, गोलु मासरे, गोकुळ चौधरी , युवराज चौधरी , गजेंद्र तांबटकर मंडळाचे अध्यक्ष अतुलसिंग परदेशी, औषध विक्रेता संघांचे सुरेश भंडारी, डॉ. ईश्वरसिंग परदेशी, इत्यादिनी विशेष परिश्रम घेतले. जेष्ठ नागरिकांनी ह्या उपक्रमाचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले.