जेष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविणार

0

शिक्रापूर । शिक्रापूर ज्येष्ठ नागरिक संघ नुकताच नोंदणीकृत करण्यात आला असून या संघाची बैठक नुकतीच शिरूर पोलिस ठाण्यात संपन्न झाली. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या अडचणी मांडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी यांनी केले असून त्यांच्या सर्व अडचणी सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले, उपनिरीक्षक गणेश वारुळे यांनी जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. ही बैठक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पतंजली योग समितीचे तालुकाध्यक्ष अंकुश घारे व पोलिस नाईक अनिल जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. श्रीकांत ढमढेरे, विठ्ठल सासवडे, चंद्रकांत खेडकर, अशोक कुदळे, बाळासाहेब शेंडे, अर्जुन शिर्के, लक्ष्मण गायकवाड, अशोक हिरवे आदींसह अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध उपक्रम राबविणार
नवीन कायद्यानुसार मुलांनी आई-वडिलांचा सांभाळ करणे बंधनकारक असून कोणासही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. ज्येष्ठांनी व्यायाम व वाचनाकडे लक्ष द्यावे तसेच त्यांच्या असलेल्या अडचणी आमच्याकडे मांडाव्यात म्हणजे आम्हाला त्या अडचणी सोडविता येणार असून ज्येष्ठांसाठीच्या सर्व नवनवीन योजना तुमच्यापर्यंत पोहचविणार असून यापुढे विविध उपक्रम वा सांस्कृतिक कार्यक्रम राबविणार असल्याचे देखील रमेश गलांडे यांनी सांगितले.