जळगाव । स्वच्छता हा मानवी जीवनातील आरोग्य हितासाठी अविभाज्य घटक आहे. त्यामुळे जीवनात आनंदी आणि प्रसन्न राहण्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाभा अणुसंशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ पद्मश्री शरद काळे यांनी जेसीआय जळगावतर्फे जेसी सप्ताहात ’समानता’ दिनानिमित्त आशादीप महिला वसतिगृहात ’कौशल्य विकास रोजगार’ याविषयावर कार्यशाळेत बोलत होते. अध्यक्ष प्रा.रफिक शेख, आबासाहेब पाटील, वसतिगृह काळजी वाहक सुनंदा वाघुळदे, वरून जैन, युसूफ शहा, जरीयान सय्यद, मोईन खान, मीनाक्षी खरे, जिनल जैन उपस्थित होते. घरातील, परिसरातील जेवढ्या कचरा कुंड्या असतील, त्यांचे चांगल्या प्रकारे नियोजन विल्हेवाट करणे महत्वाचे आहे. तसेच कचर्यांची विल्हेवाट करताना आपणास रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात; परंतु त्याला जोड हवी तुमच्या शिक्षणाची आणि आवश्यक त्या ज्ञानाची. कचरापासून खत निर्मिती, टाकाऊ प्लास्टिकपासून नवीन प्लास्टिक निर्मिती असे विविध प्रकारचे संकलित कचरापासून नवीन वस्तू निर्माण करू शकतात, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच शिक्षणाची आवड निर्माण, करा तसेच वाचन वाढवणे तुमच्यातील सुप्त गुणांना पुढे नेईल. त्याकरिता ग्रंथालयाची सुरुवात करा, असेही सांगितले.
अशिक्षितपणाचा विचार काढून टाका – बडगुजर
अशिक्षितपणाचा विचार आपल्या मनातून काढून टाका. कारण असे अनेक रोजगार आहेत ज्यांना शिक्षणाची नव्हे तर कलेची गरज असते. प्रशिक्षण वर्गातून कला विकसित करून रोजगार उपलब्ध करणे सोईचे होईल. शासनाच्या विविध योजना या रोजगाराभिमुख आहेत. शासन देखील त्यांच्या वतीने नवीन रोजगार सुरु करण्यार्यांसाठी कर्ज उपलब्ध करून देते. महिला बचत गट, ब्युटी पार्लर, संगणक प्रशिक्षण, शिलाईकाम असे अनेक रोजगार तुम्ही स्वत: करू शकतात असे जिल्हा उद्योग केंद्राचे निवृत्त उद्योग विस्तार अधिकारी हेमचंद बडगुजर यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून जेसीआय जळगावतर्फे पर्यावरणासंदर्भात जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. येत्या भविष्यात असेच उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.