जळगाव। जेसीआय जळगावतर्फे सामाजिक भाव बांधीलकी जोपासून विद्यार्थी हित जपण्यासाठी स्व. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुण्यतिथीनिमित्त युवा सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीने एक पाऊल उचलत, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील आजीवन अध्ययन, राष्ट्रीय सेवा योजना व समाजकार्य विभागाचे विद्यार्थ्यांसाठी अल्ताफ अली सैय्यद यांचे महाविद्यालय ते व्यावसायिक जगत या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.
व्यावसायिक जगात लागणार्या महत्त्वाच्या बाबीवर लक्ष वेधत संवाद कौशल्य, व्यावसायिक मूल्य, वर्तवणूक, सकारात्मक, दृष्टीकोन, आत्मविश्वास या सगळ्यांचे महत्त्व पटवून दिले. यावेळी प्रा. दिपक सोनावणे, डॉ. संगीता महाजन, प्रकल्प प्रमुख प्रतिक सेठ जीनल जैन, शिक्षकवृंद व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते. संकल्पना अध्यक्ष प्रा. रफिक शेख, वरुण जैन यांची होती. यशस्वीतेसाठी आबासाहेब पाटील, इरीयान सैय्यद, अनिस शेख यांनी परिश्रम घेतले.