जेसीबीचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू ; एकाविरुद्ध गुन्हा

0

मुक्ताईनगर- जेसीबीने निष्काळजीपणाने काम केल्याने इलेक्ट्रीक खांब्याला लागलेल्या धडकेनंतर मध्यप्रदेशातील सिंधकंजगंजच्या तरुणाचा 4 जून रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी जेसीबी चालकाविरुद्ध बुधवारी मुक्ताईनगर पोलिसात मृत्यूस ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मेहरबारसिंग परशुराम मालविया (51, रा.सिंधकंजगंज, ता.जावर, जि.सिहोर, मध्यप्रदेश) यांच्या तक्रारीनुसार संशयीत आरोपी हरेन रामसिंग ठाकूर (रा.प्रवानखेडा, ता.आष्टा, जि.सिहोर, मध्यप्रदेश) याने 4 जून 2019 रोजी दुपारी तीन वाजता कुर्‍हा ते धुपेश्‍वर रस्त्यावरील पिंप्राळा शिवारातील गोवर्णाबाई राजाराम झाल्टे यांच्या शेतात जेसीबी (एम.पी.37 जे.ए.0989) ने खड्डे खोदताना इलेक्ट्रीक खांबाला धडक दिली होती. यावेळी खांबावर काम करणारा फिर्यादीचा मुलगा भूपेंद्र मेहरबानसिंग मालविया (20, रा.सिंधकंजगंज, ता.जावर, जि.सिहोर, मध्यप्रदेश) हा खाली पडून गंभीर जखमी झाला होता व नंतर उपचाराअंती त्याचा मृत्यू ओढवला होता. दिलेल्या सूचनांचे पालन न करता हलगर्जीपणा करीत निष्काळजीपणा करीत जेसीबी हाताळल्याचा ठपका ठेवत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय प्रमोद चौधरी करीत आहेत.