जे.ई.स्कूल व ज्युनियर कॉलेजची यशाची परंपरा कायम
संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांसह पालकांचा सहृदय सत्कार
मुक्ताईनगर : शहरातील जे.ई.स्कूल व ज्युनियर कॉलेज, मुक्ताईनगर या विद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल 97.94 टक्के लागला. गुरुवारी यशस्वी विद्यार्थ्यांसह पालकांचा मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीने जे.ई.स्कूलमध्ये सत्कार करण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
यशस्वी व सर्व उत्तीर्ण विद्यार्थांचे संस्थेचे प्रेरणास्थान माजी मंत्री एकनाथराव खडसे, संस्थेच्या चेअरमन अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी अभिनंदन केले आहे. याप्रसंगी तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ.सी.एस.चौधरी, सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य आर.पी.पाटील, रुईखेडा विद्यालयाचे प्राचार्य नितीन भोंबे, उपप्राचार्य विजय लोंढे, पर्यवेक्षक व्ही.डी.बर्हाटे, पर्यवेक्षक शरद महाजन, विष्णू राणे, शिक्षक, शिक्षिका-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या विद्यार्थ्यांचा झाला पालकांसह सत्कार
विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. तालुक्यातून प्रथम- प्रथमेश महेश खेवलकर (90.33), द्वितीय- सुशांत प्रमोद सावळे (89.67), स्नेहा रवींद्र बोराखेडे (88.50), सेजल विजय राणे (88.50), श्रृती उमाकांत पाटील (88.33), श्रृतिका मनोज महाजन (87.33), कला शाखेचा निकाल 93.38 लागला. कला शाखेतून प्रथम- राजेश्री संजय कोळी (79.33), द्वितीय- माधुरी सुरेश सावळे (78), वैशाली सुपडू पाटील (77.67), शुभम विनोद पाटील (76.50), जयश्री गोपाळ बेलदार (76.50), मनिषा मनोहर गरुडे (76.17), वाणिज्य शाखेचा
निकाल शंभर टक्के लागला. प्रथम- पूजा गजानन पाटील (78), द्वितीय- दिव्या प्रमोद चौधरी (76.17), तृतीय- अविनाश पंडित वानखेडे (74.50), निकिता सुभाष मुंडेकार (74.17), प्रतिभा मधुकर झांबरे (73.50), किमान कौशल्य विभागातून प्रथम- वैभव सुरेश बेलदार (65.50)
व द्वितीय विशाल अनिल गाढे (63.83) आला.