जे.के स्कूलमध्ये सुदृढ बालक स्पर्धा

0

जळगाव । साईनगर येथील जे.के.इंग्लिश स्कूल येथे सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेस प्ले गृपचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात 2 महिन्यापासून तर 3 वर्षापर्यंतच्या बालकांचा समावेश होता. याप्रसंगी पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. स्पर्धा तीन गटात विभागण्यात आली होती. प्रशिक्षक म्हणून डॉ.एकता चौधरी, डेंटीस्ट रितीका पगारिया उपस्थित होत्या. स्पर्धेत सहभागी प्रत्येकास प्रमाणपत्र देण्यात आले. मयंक अशोक नेरकर, रुद्र जितेंद्र पाटील, सनी वेदप्रकाश आदी स्पर्धेतील विजेते आहे. यशस्वीतेसाठी ज्योती श्रीवास्तव, वनिता पाटील, मेघा कुलकर्णी, श्रध्दा पाठक, पुजा श्रीवास्तव, ज्योती कोचुरे, उज्ज्वला चौधरी, रुपाली चौधरी, दिपाली जैस्वाल, अक्षता सोनवणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांन परिश्रम घेतले. सुत्रसंचालन रुपाली पाटील यांनी तर आभार वनिता पाटील यांनी केले.