‘जे झाले ते अतिशय दु:खदायक’: अशोक गेहलोत

0

जयपूर: कॉंग्रेस नेते राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडखोरी करत कॉंग्रेस सरकारला अडचणीत आणले होते. दोन दिवसानंतर त्यांच्या परत येण्याचे काही चिन्हे दिसत नसल्याने आज अखेर कॉंग्रेसने त्यांना उपमुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले आहे. दरम्यान यावर आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जे झाले त्यावर आम्ही आनंदी आहोत असे नाही आमच्यासाठी ही अतिशय वाईट गोष्ट आहे’.

‘तुम्ही आ बैल मुझे मार’ या म्हणीप्रमाणे सचिन पायलट यांचे धोरण राहिले आहे. मागील सहा महिन्यांपासून ते असेच वागत आहेत. रोज ट्विट करणे, कॅबिनेटमध्ये विरोधात भूमिका घेणे हेच त्यांचं धोरण आहे अशी टीका आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे. यांची भाजपासोबत डील झाली आहे. त्यामुळे आता भाजपासोबत जातील किंवा नवा पक्ष काढला तरीही भाजपाला साथ देतील हे ठरले आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवले. हे करताना आम्हाला आनंद नाही झाला नाईलाजाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला असंही गेहलोत म्हणाले आहेत.