जे.टी.महाजन इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये व्यंगचित्र प्रदर्शन व हस्तपुस्तिका अनावरण सोहळा

0

फैजपूर- व्यंगचित्र कलेचे जगप्रसिद्ध कलाकार आर. के.लक्ष्मण यांच्या चित्रकारितेतूनाच प्रेरणा घेत पाठ्याशाचा एक भाग म्हणून जे.टी.महाजन इंग्लिश मिडीयम स्कूल, फैजपूर येथील मराठी विभागातर्फे विद्यार्थ्यांनी व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले. यात विद्यार्थ्यांनी स्वतः रेखाटलेल्या व्यंगचित्रातून अनेक सद्यस्थितीतील मुद्यांना स्पर्श केला. टीकात्मक नव्हे तर विनोदी तथ्यांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेली अनेकविध व्यंगचित्रे या प्रदर्शनात प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आलेली होती. सोबतच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ‘माय मराठी’ ही हस्त्पुस्तिका येथे अनावरीत करण्यात आली. या हस्तपुस्तिकेतून मराठीतील ममत्वाचा गोडवा विद्यार्थ्यांनी आपल्या लेखात व काव्यात मांडला.

छंदाची करावी जोपासना -प्राचार्य जाधव
व्यंगचित्र प्रदर्शनासाठी उपस्थित असलेले उद्घाटक व अध्यक्ष प्राचार्य मोझेस जाधव यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांची केलेली अभिव्यक्ती व संकल्पना या उल्लेखनीय आहेत. याची विद्यार्थ्यांनी पुढेही आपला छंद म्हणून जोपासना करावी व हस्तपुस्तिकेवर बोलतांना स्वमत सादर करण्यासाठी मिळालेली ही उत्तम संधी व संधीच झालेलं सोन, अस कार्य विद्यार्थ्यांनी केले असल्याचे ते म्हणाले. प्रमुख पाहुणे प्राचार्य नंदकिशोर सोनवणे म्हणाले की, विद्यार्थ्यांना या वयात होणारे असे उपक्रम भविष्याचा कलाकार घडवण्यास पोषक ठरू शकतात. अशा व्यासपीठाचा विद्यार्थी आनंदाने व उत्साहात सहभागी होऊन आपली कला सादर करत आहेत. ही खरी गौरवास्पद बाब आहे , तर हस्तपुस्तिका हे स्वतः चे विचार , भावना यांना लेखणीतून वाव फोडन्याचे अप्रतिम साधन आहे, असेही ते म्हणाले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर पर्यवेक्षिका पूनम नेहेते, उपशिक्षिका मनीषा चौधरी, मराठी विषयाचे उपशिक्षक अतुल गोराडकर आदींची उपस्थिती होती. विद्यार्थी अनिकेत जैतकर याने हस्तपुस्तिकेवर प्रतिनिधी म्हणून आपले विचार व्यक्त केले. व्यंगचित्रावर व व्यंगचित्रकारीतेवर विद्यार्थी संकेत तळेले याने प्रतिनिधी म्हणून आपले विचार मांडले. सूत्रसंचालन विद्यार्थी मुकुल फलक याने तर आभार विद्यार्थिनी विशाखा पाटील हिने मानले.