जे. टी. महाजन इंग्लिश मेडीयम स्कूल फैजपूरच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय क्रीडास्पर्धेत यश

   न्हावी प्रतिनिधी दि 11

दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या शासनांतर्गत यावल तालुकास्तरीय क्रीडास्पर्धा डांभुर्णी व डोणगाव याठिकाणी पार पडल्या. या अंतर्गत जे. टी. महाजन इंग्लिश मेडीयम स्कूल फैजपूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यातील डांभुर्णी तालुका यावल येथे पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेअंतर्गत उंच उडी (मुली)या क्रीडास्पर्धेत विद्यालयातील इ९वी च्या विद्यार्थिनी पार्थिवी अविनाश सरोदे हिने प्रथम क्रमांकवर बाजी मारले तर तन्वी नितीन पाटील हिने द्वितीय स्थान पटकावले. तर डोणगाव येथे पार पडलेल्या स्पर्धेत उंच उडी (मुले) या क्रीडा प्रकारात विद्यालयातील इ.८वी चा विद्यार्थी प्रेयस धीरज होले याने प्रथम क्रमांकावर बाजी मारली तर याच प्रकारात अथर्व दिनकर निळे यांनी द्वितीय स्थान मिळविले. यांसह येथे पार पडलेल्या गोळा फेक क्रीडा प्रकारांतर्गत विद्यालयातील इ.८वी चा विद्यार्थी मलिक मोहम्मद दानियाल ऐहतेशाम हुसैन याने प्रथम क्रमांक पटकावला. वरील यशवंत विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक राजेंद्र महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य मोझेस जाधव, पर्यवेक्षिका पुनम नेहेते व शिक्षकवृंद यांनी भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.