फैजपूर- जे.टी.महाजन तंत्रनिकेतनमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबईतर्फे संगणक क्षेत्रासाठी राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी औरंगाबाद विभागातील सुमारे 30 तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व संगणक क्षेत्रातील विविध विषयांवर सादरीकरण केले. प्रमुख पाहुणे डेप्युटी सेक्रेटरी डॉ.ए.एन.पवार, प्राचार्या डॉ. नंदिनी चौधरी, तंत्रनिकेतनचे प्राचार्य पी.बी.पाटील, किशोर मोहिते, आर.एम.चौबे, एस.एन.चौधरी, पी.व्ही.चौधरी, जे.पी.वाणी, व्ही.आर.सय्यद उपस्थित होते. ए.एस.चौधरी यांची एम. एस. बी. टी. इ. प्रतीनिधी म्हणून विशेष उपस्थिती होती.
औरंगाबाद तंत्र निकेतनने पटकावले पहिले बक्षीस
संगणक विभागप्रमुख व्ही.एम.होले, जी.एच.रायसोनी तंत्रनिकेतन संगणक विभागप्रमुख तुषार वाघ यांनी परीक्षक म्हणून जवाबदारी पार पाडली. या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारीतोषिक शासकीय तंत्रनिकेतन, औरंगाबादच्या विद्यार्थिनी पूजा जाधव, कोमल करले यांनी तर द्वितीय पारीतोषिक संदीप तंत्रनिकेतन, नाशिकच्या विद्यार्थिनी किर्ती परडे व अथिरा नायर यांनी मिळविले. तृतीय क्रमांकाचे पारीतोषिक जी.एच.रायसोनी तंत्रनिकेतन, जळगावचे रोहित पवार व प्रगती अबोटी व शासकीय तंत्रनिकेतन, जळगावचे सोहम चौधरी आणि स्वप्नील सोहळे यांना विभागून देण्यात आले. बक्षीस वितरण पी.बी.पाटील व ए.एस.चौधरी, आर.एम.चौबे, पी.व्ही.चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. आभार एम.बी.मंडवाले यांनी मानले. यशस्वीतेसाठी संगणक विभागप्रमुख एन.व्ही.नारखेडे, प्रा.एम.एन.पाटील, एस.व्ही.चौधरी, आय.एन.भारंबे, एस.ए.नेमाडे, डी.ओ.भारंबे, एस.एस.पाटील, एन.एस.फेगडे व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले.