नवी दिल्लीः भारतीय जनता पार्टीउत्तर प्रदेश मध्ये ७४ जागा जिंकेल असा विश्वास केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भाजपा नेते पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, आणि त्यांच्यावरचे आरोप जर सिद्ध झाले तर ते सगळे तुरुंगात जातील. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या उमेदवारीबाबत पीयूष गोयल यांनी समर्थन केले असून, गोयल म्हणाले, दिग्विजय सिंह यांनी हिंदू समाजाला अपमानित केले, त्याचा आम्ही बुरखा फाडला आहे. आणि त्या मुळेच आम्ही साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मधून उमेदवारी दिली आहे. आता मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे आपल्या निवासस्थानी पंडित बोलावून पूजा करीत आहेत. त्यांनीच अगोदर हिंदू दहशतवाद हा शब्द प्रचलित केला होता.
काँग्रेस पक्ष हा आधी सर्जिकल स्ट्राइक झाले आहे हे मान्य करायला तयार नव्हता. आता तेच सांगत आहेत की,आम्हीसुद्धा सर्जिकल स्ट्राइक केले होते. खरं तर काँग्रेस पक्षाने सर्जिकल स्ट्राइक झाले आहे हे एका अर्थाने बरे झाले. आम्ही राष्ट्रीय हितांच्या मुद्द्यावर सरकारला नेहमी साथ दिली होती. काँग्रेसने गेल्या 70 वर्षांत काहीही काम केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 कोटी शौचालयं तयार केली. प्रत्येकाचे जनधन योजने अंतर्गत प्रत्येकाचे बँकेत खातं उघडले गेले. गावा-गावा पर्यंत वीज पोहोचली, उज्ज्वला योजनेचा लाभ सर्व सामान्य लोकांना मिळाला आहे अआसे त्यांनी नमूद केले. तर एकी कडे ममतादीदींनी जय श्री राम म्हणणाऱ्यांना तुरुंगात पाठवलं.
ममता दीदी यांचे मतांचे ध्रुवीकरण फार काळ चालणार नसून, आज देशात मोदी लाटेची स्तुनामी पाहण्यास मिळत आहे. आज मोदी सरकार च्या काळात सगळ्या बाबतीत विकास झाला असल्याचे त्यांनी सांगितले.